टॉप बातम्या

संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे जल्लोषात उमेदवारी दाखल



सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

वणी : आज दि. २८ ऑक्टोबरला वणी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी चे उमेदवार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील हजारो च्या संख्येने समर्थक,कार्यकर्ते नामांकन रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

उपस्थितांनी विजयी शंखनाद घोषणांनी संपूर्ण आसमंत दणाणून सोडला होता.
याप्रसंगी संजीवरेड्डी बोदकुरवार उमेदवार म्हणून आणि प्रल्हाद सिंग पटेल, केंद्रीय मंत्री, दिनकर पावडे, तारेंद्र बोर्डे, रवी बेलूरकर, अविनाश लांबट, संजय पिंपळशेडे, विजय पिदूरकर, नितीन रासेकर, विशाल किन्हेकर, मनीष गायकवाड, श्रीकांत पोटदुखे,शंकर लालसरे, ज्ञानेश्वर चिकटे यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते व लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Previous Post Next Post