टॉप बातम्या

प्रवक्ते किशोर तिवारींनीं संजय देरकर यांना देण्याचा आग्रह केला

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

वणी : निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला तेव्हापासून राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात निवडणूकविषयक प्रशिक्षण कार्यक्रम वेगात सुरु आहेत. मात्र, महायुती व महाविकास आघाडी च्या उमेदवारांच्या याद्या जाहीर अद्यापही केल्या नसल्याने वणी विधानसभा क्षेत्रात राजकारण तूर्तास तापले असून इथं तिथं आमदार कोण होणार आणि कोणाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा रंगू लागली आहे. 

वणी विधानसभेत काँग्रेस भाजपा काटे की टक्कर होणार अशी चर्चा रंगत असली तरी, या दोन्ही पक्षाचा उमेदवार कोण असणार आहे. याचा तिढा अजूनही कायम असताना शिवसेना (उबाठा) चे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी विदर्भातील २०१४ व २०१९ मध्ये गमावलेल्या जागांचा आग्रह काँग्रेसने सोडावा, असं वृत्तपत्रातून वृत्त समोर आल्याने वातावरण तापले आहे. तसेंच शिवसेना (उबाठा) वणीकरिता संजय देरकर यांना आग्रह असल्याने वणी विधानसभा क्षेत्रात राजकारण आणखीनच गरम झाले असून आघाडीत बिघाडी येण्याची शक्यता तर येणार नाही,अशी उलटसुलट चर्चाना आता उधाण आल्याचे दिसून येत आहे. 

मागील लोकसभेत भाजपाने अगोदरच उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस ला संधीच सोनं करता आले असे पक्षातीलच कार्यकर्ते म्हणतात, त्यामुळे आता ती घाई कदाचित भाजपाला नसल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. दिल्ली पासून ते गल्ली पर्यंत बैठका पार पडल्या, त्यात झालेल्या बैठकीत "बंद लिफाफा" पॅटर्न राबविण्यात आला. त्यामुळे बंद लिफाफा कुणाचं नशीब उघडतो यावर सर्वांचं लक्ष खिळून असताना लाईट, कॅमेरा रेडी आहे. फक्त "ऍक्शन" म्हणायचं वेळ बाकी राहिलंय...एवढं मात्र नक्की.

मात्र,काँग्रेस च्या गोट्यात असलं काहीही नाहीये, इथे गोंधळात गोंधळ आहे. वणीत "संजय" या एकाच नावाची चर्चा होत असल्याने मलाही आमदार व्हायचंय यासाठी वणी मारेगाव झरी मधून अनेक दावेदार उभे ठाकले असल्यामुळे वणी विधानसभेमधील "काँग्रेस चॅप्टर"च क्लोज होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Previous Post Next Post