टॉप बातम्या

वन्यप्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करा - शेतकऱ्यांचे कालपासून वणीत बेमुदत ठिय्या आंदोलन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : २०२३-२४ पिकाची नुकसान भरपाई, जंगली जनावराचा कायमस्वरुपी बंदोबस्त, जंगलभागाला पक्के कम्पाऊंड करावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेती ला पक्के कम्पाऊंड द्यावे, जंगली जनावरांची नुकसान भरपाई पिक विम्यामध्ये समाविष्ट करावी अशा विविध मागण्या घेऊन नायगाव येथील असंख्य शेतकऱ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं असून आज आंदोलनाचा दिवस आहे. 

वणी तालुक्यातील नायगांव (खु.) येथील शेतकरी व परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने वनविभागाच्या विरोधात तहसील कार्यालयाच्या समोर बेमुदत ठिय्या आंदोलनाचे कालपासून हत्यार उपसले आहे. आज या ठिय्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. दोन दिवस उलटून देखील अधिकारी, ना लोकप्रतिनिधीनी भेट दिली. कोणीही शेतकऱ्यांच्या या आंदोलनाकडे फिरकले नाहीत असे आंदोलन कर्त्यांनी सांगितले. काल संबंधित विभागाचे काही लोक येवून गेले परंतु समस्या काही सुटली नाही. त्यामुळे त्यांच्या समस्या मार्गी लागल्या नसल्याने हे आंदोलन आणखीन तीव्र होण्याची संकेत असून तालुक्यातील असंख्य शेतकरी वनविभागाच्या विरोधात ठिय्या मांडून बसले आहे.
Previous Post Next Post