सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : कार्यकर्त्यांचे आजही प्रेम आहे, कोणी मला सोडून गेला नाही. त्यामुळे माझी जमेची बाजू आहे.काँग्रेस आमचा श्वास आहे. त्यामुळे राजकीय प्रवास हा शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहील. असे मत एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना माजी आमदार वामनराव कासावार यांनी व्यक्त केले.
आमची खडी फौज आहे, पक्षाचा आदेश झाला की लढायचं. नाहीतर नाही. पक्ष आदेशाच्या विरोधात आम्ही कधी जात नाही. बंडखोरी वर बोलतांना त्यांनी सांगितले की,बंडखोरी कुठंतरी थांबलेलीच पक्षासाठी हिताची आहे. काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत राहील असेही माजी आमदार कासावार यावेळी म्हणाले.
लोकसभेत जनतेनी घवघवीत यश दिले, तेच आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा तितक्याच मताधिक्याने काँग्रेस चा आमदार निवडणूक येणार, यात शंका नसावी.सत्ताधाऱ्यावर तोफ डागताना त्यांनी सांगितले की, लोकांच्या अधिकाराचे कोणी हणन करत असतील तर त्याला जनतेकडे सर्वात मोठं शस्त्र आहेत, त्याचा ते वापर करतील. काँग्रेस पक्ष हा गोरगरीब जनतेचा पक्ष आहेत. मी विचाराच्या पाठीशी आहे, मला पक्ष द्रोहाच्या डाग नाही.
जेव्हा रस्ते, आरोग्य, शिक्षण व शासकीय कामे याची मोठी गंभीर परिस्थिती होती तेव्हा वणी येथे येऊनच इतर कुठलीही कामे करावी लागत होती, आदिवासी बहुल तालुक्यातील आदिम समाज विशेषतः कोलाम समाज पुढे यावे, यासाठी माझे विशेष प्रयत्न राहिले आहे. पूर्वी सारखी परिस्थिती आज या झरी, मारेगाव तालुक्यात पाहिजे तशी राहिली नाही. असे सांगत ते म्हणाले की, मी लोकांच्या सुख दुःखात सहभागी होणारा कार्यकर्ता आहे, पुढे माध्यमाच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले,मला इतरांच्या तुलनेत घेता येणार नाही. लोक आमच्या पाठीशी भक्कमपणे आजही आहे. वणी विधानसभा मतदार संघ हा काँग्रेस कडे राहिलेला आहे. एक अपवाद सोडला तर नामदेव राव काळे, आणि सेना सोडला तर,काँग्रेस'च या संघाचा दावेदार आहेत.