सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
शिवसेना (उद्धव बाबासाहेब ठाकरे) च्या वतीने घेण्यात आलेल्या या मेळाव्याला शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड व युवासेनेचे जिल्हा प्रमुख अमोल धोपेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच माजी उपजिल्हा प्रमुख दिपक कोकास, महिला संघटिका डिमन टोंगे, शिवसेनेचे डॉ.मनिष मस्की, गणपत लेडांगे, माला बदकी, सुनिता मस्की, डॉ.सपना कलोंडे, सुरेखा भेले, माधुरी नगराळे, आदी मंचावर उपस्थित होते.
पक्ष प्रमुख उद्धव बाबासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यात "भगवा सप्ताह" घेण्यात आला, त्याच अनुषंगाने वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेना (उद्धव बाबासाहेब ठाकरे) च्या वतीने वणी मारेगाव झरी तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यात मारेगाव येथे जेष्ठ शिवसैनिक यांचा विशेष करून सत्कार करण्यात आला आहे. त्यामुळे वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वाने पक्षात नवसंजीवनी मिळाल्याचे अनेक जेष्ठ शिवसैनिकांनी यावेळी बोलून दाखवले. कार्यक्रमाचे संचालन तुळशीराम मस्की यांनी तर, आभार प्रदर्शन गोवर्धन टोंगे यांनी केले.
यावेळी वणी विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, व शिवसैनिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दादागिरी खपवून घेणार नाही - राजेंद्र गायकवाडशिवसेना पक्षाने अनेकांना मोठे केले आहे. त्यांना सन्मानाची पदे दिली आहेत. मात्र, जिल्ह्यातील काही नेते महिलांना सन्मान देत नाहीत. कार्यकर्त्यांना दमदाटी करतात, असा आरोप राजेंद्र गायकवाड यांनी केला. आम्हाला शिवसेना पक्ष (उबाठा) मोठा करायचा आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशावरून गाव तिथे शिवसेना व घर तिथे शिवसैनिक हे अभियान यशस्वी करायचे आहे. त्यामुळे पक्षात कोणत्याही नेत्याची दमदाटी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दमदाटी करणाऱ्या नेत्यालाच बाजूला सारून पक्ष संघटन बळकट करण्याला प्राधान्य दिले जाईल, असे गायकवाड यावेळी म्हणाले.