सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे
राळेगाव : माधवराव कोहळे हे अनुसुचित जमाती साठी राखीव राळेगाव मतदार संघातुन यापुर्वी बसपा व वंचित बहुजन आघाडी कडुन अनुक्रमे दोनदा निवडणूक लढले. दोन्ही वेळी त्यांनी तिरंगी लढतीत तिसऱ्या क्रमांकाची मते घेऊन प्रस्थापित पक्षांना घाम फोडला.
आता माञ त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी चंद्रपुर आर्णी लोकसभा क्षेत्रात भाजप उमेदवाराचा तर वाशिम यवतमाळ मतदार संघातील राळेगाव मतदार संघात मिञ पक्षासाठी आपल्या कार्यकर्त्यांसोबत प्रचाराची धुरा सांभाळली.मागील लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्राचा निकाल पाहता भारतीय जनता पक्षाने येत्या विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे सुतोवाच केले आहे.त्यामुळे येत्या आॕक्टोबर महीन्यात होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राळेगाव विधान सभा क्षेत्रात आपल्याला उमेदवारी देऊन स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षापासुन महाराष्ट्र विधानसभेत कधीही प्रतिनिधित्व न मिळालेल्या गोंड गोवारी या वंचित समाजाला संधी द्यावी अशी विनंती त्यांनी पक्षाकडे केली आहे.मा.सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 18/12/2020 च्या निर्णयाने व 1961 च्या जनगणनेनुसार विदर्भातील तत्कालीन वणी,केळापुर, यवतमाळ, मेळघाट,सिरोंचा व गडचिरोली या तालुक्यातील गोवारी हेच गोंड गोवारी आहे यावर सुप्रिम कोर्ट आदेशातील मुद्दा क्र.31,32,33 नुसार शिक्कामोर्तब झाल्याने आरक्षणाचा मार्गही मोकळा झाला आहे.
त्यामुळे राळेगाव क्षेत्रातील या समाजाची मोठी संख्या पाहता पक्षाने माधव कोहळे यांच्या उमेदवारीचा विचार केल्यास भाजपाचा या मतदार संघातुन विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो.सोबतच माधव कोहळे यांच्या उमेदवारीमुळे विदर्भातील बेचाळीस विधानसभा मतदार संघातील या समाजाचे प्राबल्य लक्षात घेता भाजपाला खुप मोठा फायदा होऊ शकतो.