सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : कोसारा येथील गावाच्या काही अंतरावर असलेल्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे वरोरा ते माढळी ते खैरी वडकी कडे जाणारी वाहतूक ठप्प पडली आहेत.
तालुक्यात मागील चार ते पाच दिवसांपासून पाऊस पडत आहे. मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने मारेगाव तालुक्यातील कोसारा परिसरात पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे दुपारपासून वरोरा, माढेळी, खैरी-वडकी बस सेवा ठप्प पडली आहेत. तर इतरत्र वाहतूक अडकली आहे. त्यामुळे प्रवाशांनाही मनःस्ताप होत आहे.
येथे वर्धा नदीचे पाणी दोन तीन फूट रस्त्यावर आले आहे. वडकी खैरी माढळी ते वरोरा मार्ग वाहतूक बंद आहे. येथे वर्धा नदीचे पाणी पुलावर आले आहे.कोणीही पूल ओलांडून प्रवास करू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.