सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील महिलांनी गावात बेकायदेशीरपणे (illegally) सुरू असलेल्या दारू विक्री (liquor sales) विरोधात (against) पोलीस ठाण्यावर धडक दिली. त्यांनी गावात दारुबंदी (liquor ban) करण्याची मागणी केली.
मारेगाव तालुक्यातील खैरगांव (बु.) गावात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री फोफावल्याने महिलांनी या विरोधात आवाज उठवला. अनेक कुटुंबांवर याचा परिणाम होत असून, महिलांनी याविरोधात एकत्र येऊन पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दारुबंदी करण्याची मागणी करत पोलिसांना निवेदन दिले.
गेल्या काही महिन्यापासून मार्डी सर्कल मध्ये अवैध दारु विक्री व्यवसाय जोमात आहे. या गैरप्रकारांची तक्रार दिल्यानंतर वणी येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग क्र. 2 कार्यालयात आपली फिर्याद दाखल केली आहे. सरपंच रामचंद्र जवादे व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संदिप झोटिंग यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या निवेदनावर मनिषा तुरारे, जयश्री हिवरे, माधुरी चिकाटे, पुष्पा बोढाले, आशा मेश्राम, ज्योती कुमरे, सुषमा गांजरे, निता झिले, प्रतीभा तुरारे, उज्वला बोबडे, निलीमा निवल, वर्षा कुमरे, उर्मिला ठाकरे, रजनी कुमरे, मंजुळा जुमनाके, वैशाली वांढरे, यासह अनेक महिलांच्या सह्या आहेत.
खैरगाव (बु.) येथील महीला शिष्टमंडळाने गावातील अवैध दारु व्यवसाय बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची दखल घेऊन तत्काळ कारवाई केली जाईल.-सुरेंद्र बुटलेदुय्यम उपनिरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क विभाग क्रमांक वणी