सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : 9 जुलै 2025 रोजी केंद्रीय कामगार,श्रमीक संघटना व संयुक्त किसान मोर्चाचे वतीने देशव्यापी संपाचे,आदोलनाचे आयोजन केले आहे.या आंदोलनाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सक्रीय पाठींबा देऊन प्रत्यक्ष सहभागी होणार आहे.याच अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील 16 ही तालुक्यात भाकप व आयटकने आंदोलन करण्याचे आयोजिले आहे.
यामध्ये वणी येथे जिल्हासचिव काॅ.अनिल घाटे,तालुकासचिव काॅ.मोरेश्वर कुंटलवार यांचे नेत्रुत्वात,राळेगाव येथे तालुकासचिव काॅ.प्रविण आडे,बाभुळगाव येथे काॅ.गुलाबराव उमरतकर,काॅ.दिपक माहुरे,नेर येथे काॅ.महाजन,काॅ.प्रा.प्रविण बंसोड यांचे नेत्रुत्वात,दिग्रस येथे तालुकासचिव काँ.किशोर कदम,काॅ.पि.जी.गावंडे,काॅ.प्रदीप नगराळे,काॅ.खंडारे यांचे नेत्रुत्वात,पुसद येथे तालुकासचिव काॅ.अमोल गौरशेट्टीवार,काॅ.खुर्शीद वजुद,काॅ.निखील टोपलेवार,काँ.सुरेंद्र गडदे यांचे नेत्रुत्वात,यवतमाळ येथे तालुकासचिव काॅ.ईश्वर दरवरे,काॅ.संजय भालेराव,काॅ.अॅड.अरुण जवके,काॅ.विजय ठाकरे,काॅ.दिवाकर नागपुरे यांचे नेत्रेत्वात,मारेगाव येथे तालुकासचिव काॅ.बंडु गाेलर यांचे नेत्रुत्वात तर उर्वरित तालुक्यात आयटकचे पदाधिकारींचे नेत्रुत्वात आंदोलन होणार असुन संपुर्ण जिल्हाभर लाल वादळ येणार आहे.
या आंदोलनात पक्षाचे सर्व सभासदांनी जनतेला सोबत घेऊन हजारोंच्या संख्येने सहभाग व्हावे असे आवाहन भाकप जिल्हा कौंसिलने केले आहे.