म्हशी घेऊन जाणारा कंटेनर पोलिसांच्या ताब्यात; चार आरोपींना केले जेरबंद


सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे

राळेगाव : नागपूर - हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरून जनावरं तस्करीचा डाव हाणून पाडत वडकी पोलीसांनी तब्बल ५५ म्हशींना जिवदान दिले आहे. या कारवाईत पोलिसांनी चार संशयित आरोपींसह एक कंटेनर व जवळपास ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हि कारवाई १० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता सिंगलदीप फाट्यावर केली.

वडकी पो. स्टे. ला नव्याने रुजू झालेले ठाणेदार सुखदेव भोरकडे यांनी जनावर तस्करांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केल्याचे सततच्या कारवाई वरुन दिसून येत आहेत. अशातच गोपनीय माहितीच्या आधारे राष्ट्रीय महामार्गावरील सिंगलदिप फाट्याजवळ पोलिसांनी नाकाबंदी करून आर. जे. ४० जी. ए. ४२६६ या क्रमांकाच्या कंटेनरची तपासणी केली त्यात तब्बल ५५ नग म्हशी आढळून आल्या. 

या प्रकरणी पोलिसांनी साद अलीम मेहू (२४) रा. हरीयाणा, आशिफ साकीब शेख (३४), हाशिम शोकत कुरेशी (४०) व शादाब साकीब शेख (४२) सर्व रा. बागवत उत्तर प्रदेश या संशयित आरोपींना ताब्यात घेऊन विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून या घटनेचा पुढील तपास पीएसआय प्रशांत जाधव हे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post