सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : स्व.माजी प्रधानमंत्री भारतरत्न राजीव गांधी यांच्या 80 व्या जयंती निमित्ताने वणी शहरात वसंत जिनीग अध्यक्ष तथा तालुका काँग्रेस कमिटी,झरी तालुका अध्यक्ष आशिष खुलसंगे यांच्या सौजन्याने रस्त्यावरील लघु उद्योग करणाऱ्यांना कडक उन्ह आणि पाऊसापासून बचाव व्हावा या उद्दात उद्देशाने छत्री वाटप करण्यात आल्या.
माजी आमदार वामनराव कासावार, अॅड. देविदास काळे, राजू एलटीवार, ओम ठाकूर, सौ. संध्या बोबडे, विवेक मांडवकर यांच्या उपस्थितीत छत्री वाटपाचा लोकहितार्थ उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी शहरातील उदरनिर्वाहासाठी फळे, भाजीपाला, कपडा व्यवसायिक, मोची व इतरही लहान व्यवसायधारक रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांना पावसापासून व उन्हापासून बचाव करण्यासाठी मोठ्या छत्रीचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे या छत्री पासून रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.