टॉप बातम्या

युवासेनेत असंख्य कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : तालुक्यातील नायगाव (वरोरा रोड), घोंसा व भालर या गावातील असंख्य युवकांनी पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर व युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे याच्या उपस्थितीत युवासेनेचे वणी शहराध्यक्ष साकेत भुजबळराव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत 24 ऑगस्ट रोजी युवासेनेमध्ये पक्षप्रवेश केला.

यामध्ये विशेषतः नवंतरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. सध्या राजकारणात साकेत भुजबळराव हे खूप ऍक्टिव्ह असून समाजकारणात व राजकारणात आपले फार योगदान देत आहेत. सोबतच सध्याचे युवा पिढीत ते लोकांना मार्गदर्शन व प्रोत्साहीत करून युवासेनेत पक्ष प्रवेश घेत आहे.  
 
यावेळी माजी उपजिल्हाप्रमुख दीपक भाऊ कोकास, राज्यकार्याध्यक्ष अविनाश भाऊ भुजबळराव, माजी उपशहर प्रमुख अजय भाऊ चन्ने यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती.  वैभव पिंपळशेंडे व सुनील खडतकर व त्यांच्या मित्रपरिवाराने युवा सेनेमध्ये प्रवेश घेतला.

 याप्रसंगी राज्य संघटक सतीश भाऊ जोगी, कुंभाचे शाखा प्रमुख अंकुश जोगी, सामित भुजबळराव, अनिकेत टिकले, लखन व विपुल व समस्त युवासेना व शिवसेनेचे आजी व माजी पदाधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Post Next Post