सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : वंचित बहुजन आघाडी, वणी आघाडीच्या वतीने आज स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
देशात शांतता, एकता, बंधुता कायम ठेवत, भारतीय राज्यघटना, लोकशाही व्यवस्थेची जपणूक करीत, 78 व्या स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात असताना या दिनानिमित्त वणी येथे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष हरीश पाते यांच्या नेतृत्वात प्रथमच येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये स्वातंत्र्य दिना निमित्त झंडा वंदन करण्यात आले.
यावेळी नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष हरीश पाते, जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग, तालुका जिल्हा महासचिव वैशाली गायकवाड मॅडम, महासचिव आशिष पाझारे, महिला जिल्हा उपाध्यक्ष अर्चना कांबळे, जिल्हा सरचिटनीस मोरेश्वर देवतळे, ता. उपाध्यक्ष अर्चना नगराळे, ता. कार्याध्यक्ष प्रणिता ठमके, शहराध्यक्ष किशोर मुन, पदाधिकारी संतोष पेंदोर, रंजीता वाळके, महादेव रायपुरे, पुजा सिडाम, भारती पेंदोर, दसरथ खोब्रागडे, घनश्याम जुमडे, अरुण ऊंदीरवाडे, कोमल चांदेकर, नरेंद्र वाकळे, सागर बालारे, गजानन दामोदर, रवि कांबळे, प्रदीप मडावी, संदेश भोयर, व सर्व आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.