सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : 78 व्या स्वतंत्र दिना निमित्त सन 2023-24 मारेगाव तहसिल कार्यालया मार्फत उत्कृष्ठ तलाठी म्हणून संदेवल कुडमेथे यांची निवड करुन तहसीलदार उत्तम निलावाड, नायब तहसीलदार रामगुंडे, नायब तहसीलदार भगत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र येथील तहसील सभागृहात त्यांना प्रदान करण्यात आले.
महसूल विभागा मार्फत येणारे विविध महत्वपूर्ण कार्य तसेच जन कल्याणार्थ राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणी करिता सन 2023/2024 चा महसूल वर्षात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी व त्यांच्या कार्याना उजाळा मिळावा या उद्देशाने महसूल दिनानिमित्त सत्कार केला जातो. त्याच अनुषंगाने गतिमान व लोकांभिमुख प्रशासनासाठी केलेल्या कार्याबद्दल मारेगाव तालुक्यातील उत्कृष्ट तलाठी म्हणून संदेवल कुळमेथे यांना "महसूल दिना निमित्त" प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी तहसील कार्यालयातील सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी, व मान्यगण उपस्थित होते.