सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : अविनाश लांबट हे मारेगाव तालुक्याच्या सामाजिक, राजकीय व आर्थिक विकासासाठी राजकारणाच्या माध्यमातून सदैव धडपडत असतात. यासाठी ते भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष म्हणून काम करतांना सर्व पक्षीय मिञमंडळ, माध्यमांना, तालुक्यातील युवकांना सोबत घेऊन काम करतात. त्यामुळे ते मारेगाव तालुक्याच्या विकासासाठी झपाटलेले व्यक्तीमत्व आहे, असे गौरवोद्गार भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या वाढदिवसानिमित्य कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव येथील सभागृहात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना भाजपाचे नेते माधव कोहळे यांनी काढले.
यावेळी माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, भाजपा जेष्ठ नेते मंगेश देशपांडे, अ.भा.स.परिषदेचे सचिव सुरेश लांडे, किसान आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शंकर लालसरे, ता. सरचिटणीस प्रशांत नांदे, जेष्ठ नेते जयंताजी लांबट, पारस गंधर्व चे संचालक प्रवीण भाऊ बोथले यांची विचारपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
आज 16 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष व अविनाश भाऊ लांबट मित्र परिवाराच्या वतीने छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज शुक्रवारी तालुक्यात पाऊसाने जोरदार हजेरी लावली, त्याच प्रमाणे त्यांच्या शहर व ग्रामीण मित्र परिवारांनी देखील पावसाला न जुमानता आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात उत्साहवर्धक उपस्थिती दर्शवली. त्यांच्या या उपस्थितीने व प्रेमरूपी आशिर्वादामुळे श्री. लांबट हे भारावून गेले होते, ते शेवटी बोलताना म्हणाले की, असेच प्रेम, आशिर्वाद कायम माझ्या पाठीशी असुद्या, आपल्या सर्वांच्या शुभ आशिर्वादांचा, शुभेच्छांचा मनःपूर्वक स्वीकार करतो. एवढं बोलून त्यांनी सर्व हितचिंतकांबाबत सदभावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन पवन ढवस यांनी केले. तर आभार अध्यक्ष अविनाश लांबट यांनी मानले.