सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : आगामी निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टी च्या च्या वतीने तालुका अधिवेशन स्थानिक शेतकरी सुविधा केंद्रात आयोजीत करण्यात आले होते. शाम प्रसाद मुखर्जी, भारत माता, दिनदयाळ उपाध्याय, यांच्या प्रतीमेचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे होते तर उद्घाटन वणी विधानसभा मतदार संघाचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, यांनी केले.प्रमुख पाहुणे म्हणुन दिनकरराव पावडे, संजय पिंपळशेंडे, नितीन वासेकर, अविनाश लांबट, शंकर लालसरे, ज्ञानेश्वर चिकटे, प्रशांत नांदे, गणेश झाडे, माधव कोहळे, मंगेश देशपांडे, पवन ढवस, शशिकांत आंबटकर, शोभा नक्षिणे, सुनिता पांढरे, शालीनी दारूंडे, नगरसेवक राहुल राठोड, अनुप महाकुलकर हे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मा.श्री. नरेंद्र मोदी यांनी मागील लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी पूर्ण बहुमत मिळून देत सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होण्याचा ऐतिहासिक यशाबद्दल "अभिनंदन ठराव" मांडला.
या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागेव, व विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवावी,असे आवाहन देखील आमदार बोदकुरवार यांनी केले.
सोमवार रोजी पक्षाचे वतीने घेण्यात आलेले अधिवेशन मोठ्या थाटात संपन्न झाले. या प्रसंगी अनेकांच्या खांद्यावर तालुक्याची जबाबदारी देत त्यांची तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी तालुक्यातील भाजपा महिला,पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.