सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत लवकरच पोलीस ठाण्यांमधील हक्क नसलेल्या वाहनांचा लिलाव दि.15 ऑगस्ट नंतर होणार आहे, न्यायालयाने आदेश दिल्याने 32 मोटरसायकल व कार या वाहनांचा लिलाव घेण्यात येणार असं पोलीस प्रशासनाने कळवलं.
विविध गुन्ह्यातील पोलीस ठाण्याच्या आवारात एकूण 32 बेवारस दुचाकी वाहने उभी होती. या वाहनांची लिलाव न्यायालयाच्या आदेशानुसार होणार आहे. विविध कंपनी च्या दुचाकी, गाडी ची नंबर सह यादी शिरपूर पोलीस स्टेशन ला लावण्यात आली असून ठाणेदार माधव शिंदे यांनी आवाहन केले की, ज्यांच्या मालकीच्या आहेत त्यांनी येत्या 15 ऑगस्टपूर्वी दुचाकी वाहनाच्या मुळ कागदपत्रे घेऊन येणे व आपला हक्क सिद्ध करावा. अन्यथा न्यायालयाच्या आदेशानुसार 15 ऑगस्ट नंतर जाहिर यादीप्रमाणे गाड्यांचा लिलाव करण्यात येणार आहे.