सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
बंडू माधव ढवस (54) रा. मच्छिन्द्रा असे रेती तस्कराचे नाव आहे. पोलीस माहितीनुसार मौजा मच्छिंद्रा गावालगत असलेल्या नाल्यामधुन बंडु धवस हा त्याचे मालकीचे पिकॲप गाडी मध्ये अवैधरित्या रेती भरत असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलीस स्टेशन ला रात्रीच मिळाली असता याबाबत ठाणेदार शंकर पांचाळ यांना माहीती देवुन जि.उपनि प्रमोद जिददेवार, स.फौ. दत्तु किनाके हे मच्छिंद्रा येथील नाल्यात 10.30 वाजताचे दरम्यान पोहचले असता मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी,नाल्यामध्ये एक इसम गाडीमध्ये रेती भरताना आढळून आला. सदर ठिकाणी गाडी मध्ये रेती भरत असलेल्या इसमास लगेच पकडले व त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव बंडु माधव ढवस (वय 54) रा. मच्छिंद्रा असे सांगीतले. दरम्यान गाडीची तपासणी केली असता महींद्रा पिकॲप वाहन क्र. (MH-34, AB 5404) ही आहे. घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी सदर मालक बंडु ढवस व त्याच्या मालकीचे वाहनासह नाल्यामधुन पंचा समक्ष जप्त करून सदरची महिंद्रा पिकअप (एम एच 34, ए बी 5404) ही गाडी व अर्धा ब्रास रेती किंमत 3000/- रु असे एकूण किंमत 1,83,000/- रु. चा मुद्देमाल रात्री 10.30 ते 11.15 वा. या दरम्यान ताब्यात घेवुन मारेगाव पो.स्टे.ला आणले असून सदरचे कृत्य कलम 303 (2), 62 भारतीय न्याय संहिता प्रमाणे होत असल्याने त्याचे विरूध्द गुन्हा दाखल होणेस कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कार्यवाही ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनि प्रमोद जिददेवार, स.फौ. दत्तु किनाके, रजनीकांत पाटील व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी पार पाडली.