सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : भारताच्या प्रमुख तिर्थक्षेत्रापैकी एक महाराष्ट्राच्या अस्मितेचा शिरपेचात मनाचा तुरा समजला जाणारी म्हणजे आषाढी पौर्णिमा...हृदयाचा ठोका चुकू शकतो पण आषाढीवारी खंड पडत नाही... करोडो संख्येने आपल्या विठ्ठलाला व पांडुरंगाच्या भेटीला प्रतीवर्षे चातका सारखी वाट पाहणारा भोळा भाविक आज हजारो च्या संख्येने वस्ती वाड्यातून खेड्यापाड्यातून मिळेल त्या मार्ग व मिळेल ती व्यवस्थेने आपल्या विठ्ठल दर्शना साठीजातं असतो.
आज राजूर सर्कल येथील पळसोनी-मुर्धोनी येथील सर्व भाविक भक्त आषाढी वारी निमित्य वणी डेपोतून आज रवाना होणार होते, त्यानिमित्ताने आज सहपत्नी जावून सर्व भाविक भक्ताचे स्वागत करून व महिलांना हळदी-कुंकू करून त्यांना आषाढीवारी साठी शुभेच्छा दिल्या, त्यावेळी सर्व भाविक भक्त उपस्थित होते.