टॉप बातम्या

मार्डी येथे धाडसी चोरी, एकाच रात्रीत तीन दुकाने फोडली !

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्यातील मार्डी येथे शनिवारी पहाटे धाडसी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एकाच रात्रीत चोरट्यांनी तीन दुकाने फोडून पळ काढला. या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची पोलीस विभागाने दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

मार्डी गावातील गौरव अनंतवार यांचे वैष्णवी ज्वेलर्स, हरीश नागपुरे यांचे गुरुदेव मेडिकल स्टोअर्स, मनोहर ठाकरे यांचे साई किराणा या दुकानांना फोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. 20 जुलैला पहाटे 2.50 ते 3.30 या वेळेत पांढऱ्या रंगाची इंडिगो कार मधूनखाली उतरत चेहऱ्याला बांधलेले चार जण रस्त्यावरून फिरताना तर एक जण पांढऱ्या रंगाची कार चालवत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात दिसत असल्याने चोरटे पाच जण असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार शंकर पांचाळ, पीएसआय डी.जी.सावंत, एएसआय भालचंद्र मांडवकर, रजनीकांत पाटील, अजय वाभिटकर, प्रमोद जिड्डेवार, विजय वानखडे अधिक तपास करून चोरट्याचा शोध घेत आहे.
Previous Post Next Post