टॉप बातम्या

संजय खाडे यांचा जनहित केंद्राच्या माध्यमातून लोकसेवा करण्याचा संकल्प

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त बाळूभाऊंनी चालवलेल्या लोककल्याणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन श्री. संजय रामचंद्र खाडे यांनी उद्या दिनांक ४ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता, खाती चौक, विराणी टॉकीज रोड वणी येथे “चालतं-फिरतं जनहित केंद्र" या नव्या मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 
श्री. संजय खाडे यांनी जनहित केंद्राच्या माध्यमातून लोकसेवा करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. या केंद्राच्या माध्यमातून शेतकरी, मोलमजुर, महिला, युवा व दिव्यांग यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सर्वसामान्य जनतेचे जीवनमान सुलभ आणि सुकर करणे प्रामाणिक हेतू मनात ठेऊन ही मोहीम श्री. खाडे यांनी हाती घेतली आहे. 
तरी उद्या होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमाला परिसरातील सर्व मायबाप जनतेने, पदाधिकाऱ्यांनी-कार्यकर्त्यांनी व पत्रकार बंधू - भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन संजय रामचंद्र खाडे यांनी केले आहे. 
Previous Post Next Post