टॉप बातम्या

वणीत छत्रपति शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळ्यादिनी लाठी-काठी व सत्कार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील छत्रपति शिवाजी महाराज शिवतीर्थावर आज 6 जून निमित्त शिव स्वराज्य मंच व शिवराज्यभिषेक सोहळा समिती तर्फे छत्रपति शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळा, सकाळी 8.30 वाजता संपन्न झाला. या प्रसंगी भव्य शिवकालीन लाठी काठी आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. 
कार्यक्रमाचे विशेष अतिथी मा. श्री संजीवरेड्डी बोदकुरवार आमदार वणी विधानसभा क्षेत्र, मा. श्री संजय खाडे अध्यक्ष जय जगन्नाथ मल्टी टेस्ट कॉ. बँक. प्रा.लि. वणी, सौ.किरणताई देरकर अध्यक्ष एकविरा महिला पतसंस्था, मारेगाव, सौ. संगीता खाडे अध्यक्ष लक्ष्मी नारायण पतसंस्था, वणी, मा. श्री.बंटी प्रेमकुंठावार अध्यक्ष शिवराज्याभिषेक सोहळा समिती वणी, यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
छत्रपति शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळा दिनी शिव कालीन लाठी-काठीचे आयोजक नृसिंह व्यायाम शाळा वणी, व शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित शिव स्वराज्य मंचचे अध्यक्ष राहुल दबडे, उपाध्यक्ष दिवाकर राठोड, व सर्व सदस्यगण रोहन नांदे, कुणाल ठोंबरे, चेतन सिडाम, मंगेश भोयर, अमोल भगाडे, रोशन बुरडकर, सूरज यादव, सागर डोंगरे, योगेश दहाडकर, समीर सैय्यद, लखन वाघडकर, रितिक वैध, आदित्य अबलवार, आकाश दुर्गे, सुमित बुरडकर, आदित्य केराम, दिनेश काकडे, कमलेश काकडे, मनिष काकडे आदींनी अथक परिश्रम घेतले.
Previous Post Next Post