टॉप बातम्या

नवरगाव येथील शेकडो भोई बांधवानी भाजपात केला पक्ष प्रवेश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात काल बुधवार ला मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील भोई समाजातील शेकडो बांधवांनी भारतीय जनता पक्षात पक्ष प्रवेश केला तसेच हिवरी येथील आमदार विशेष निधी अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन श्री. बोदकुरवार यांचे हस्ते करण्यात आले.

देशाचे नेते प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व मान्य करत राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात राज्यभरात गाव चलो अभियान, नमो अँप सह नमो चषक नोंदणी तसेच मा. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या विशेष प्रयत्नाने वणी विधानसभा क्षेत्रात 2022 ते 2024 पर्यंत झालेली प्रमुख विकास कामे पोहचवण्याकरिता युद्ध पातळीवर काम सुरु आहेत.

या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा दिनकर पावडे (वणी), भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश लांबट, भाजपा यु.मो.तालुकाध्यक्ष गणेश झाडे, महिला तालुका सरचिटणीस शालिनीताई दारुंडे, रवींद्र गारघाटे व भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post