Page

श्री.संजय खाडे मित्र परिवारातर्फे राज्यस्तरीय शंकरपटाचे आयोजन

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : जत्रा मैदान येथे स्व. खासदार बाळू धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ विदर्भ केसरी जंगी राज्यस्तरीय शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा दोन गटात होणार आहे. एका गटात पूर्णवाढ झालेली बैलजोडी, तर दुस-या गटात तरुण बैलांची जोडी सहभागी होणार आहे. यात नाशिक, पुणे, नागपूर, हिंगोली, जालना, परभणी, जळगाव इत्यादी जिल्ह्यातील बैलजोडी सहभागी होत आहे. यामध्ये वणी विधानसभा क्षेत्रासाठी गावगाडा ही विशेष स्पर्धा असणार आहेत. यात केवळ वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे.

'अ' गटात पहिले बक्षिस १ लाख १ हजार, दुसरे ७१ हजार, तिसरे ५१ हजार रुपये, यासह १३ रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहे. तर 'क' गटात पहिले बक्षिस ४१ हजार, दुसरे ३१ हजार, तिसरे २१ हजार यासह आणखी १३ बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. तर गावगाडा स्पर्धेसाठीही आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राजाभाऊ पाथ्रडकर, जयसिंग गोहोकर, प्रमोद वासेकर, पुरुषोत्तम आवारी, शंकरराव व-हाटे, संजय सपाट, तेजराज बोढे, विवेक मांडवकर, सुनिल वरारकर, प्रशांत गोहोकर, प्रेमानंद धानोरकर, रुपेश ठाकरे, सुर्यकांत खाडे, प्रफुल्ल उपरे, जितेंद्र बोंडे, सतिश खाडे, अमित संते, नितिन खाडे, अनिल भोयर, मनिष खाडे, इत्यादींचा समावेश करून समिती स्थापन करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समिती व संजय खाडे मित्र परिवार परिश्रम घेत आहे.
विशेष उल्लेखनीय की, जय जगन्नाथ मल्टीस्टेट क्रेडिट को. ऑप. सोसायटी लि., वणी या नव्या संस्थेचे उद्घाटन सोहळा मंगळवार दि.२०/२/२०२४ ला दुपारी १२.०० वाजता संपन्न होणार आहे, यासाठी सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय आहे. आणि सायंकाळी ७.०० वा. जागतिक किर्तन संमेलनात मानप्राप्त ह.भ.प. श्री. माधवराव धुमकेकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला आहे, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजन समिती व संजय खाडे मित्र परिवारातर्फे करण्यात येत आहे.

शंकरपट ही केवळ बैलांची शर्यत नसून ती आपल्या कृषी संस्कृतीचा एक भाग आहे. गेल्या अनेक शतकांची याला परंपरा आहे. अलिकडे यावरील बंदी उठली. त्यामुळे शेतक-यांची ही परंपरा जपण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. वणी येथे २६ वर्षांनंतर प्रथमच ही स्पर्धा रंगणार असल्याने वणी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा थरार अनुभवावा.

- संजय खाडे
कापूस पणन महासंघाचे संचालक, वणी