मच्छिन्द्रा येथे शिवजयंती उत्सहात साजरी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आज सोमवार पासून मच्छिन्द्रा येथे श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ तर्फे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५५ वा पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त दि.१९,२० ते २१ फेब्रुवारी २०२४ असे तीन दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उदघाटक वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान आयोजित कार्यक्रमाला श्री. बोदकुरवार यांनी संबोधित केले. या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चाचे श्री.दिनकर पावडे (वणी), भाजपाचे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश भाऊ लांबट, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिलीप डाखरे, मध्यवर्ती प्रसारक गंगाधर महाराज यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी गुरुदेव सेवा भजन मंडळाचे सदस्य व परिसरातील गुरुदेव उपासक तथा उपासिका आणि समस्त गावकरी, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने वणी विधानसभेचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार मा संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा मंडळाच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन व ग्रामगीता भेट देण्यात आली, सत्कार स्वीकारताना सन्माननीय आमदार साहेबांनी गावविकासाकडे लक्ष द्या, मी सदैव तुमच्यापाठीशी असल्याचे ग्वाही दिली.
Previous Post Next Post