टॉप बातम्या

कोसारा (सोईट) येथे श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताह सोहळ्याची सांगता

सह्याद्री चौफेर | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील कोसारा (सोईट) येथे श्री.हनुमान मंदिर , विठ्ठल रुक्मिणी मंदिर व नानाजी महाराज मंदिरच्या भव्य प्रांगणात श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताह सोहळा संपन्न झाला. दिनांक 17 फेब्रुवारी 2024 ते 24 फेब्रुवारी 2024 पर्यंत ह.भ.प.अविनाश महाराज भोयर मी.आळंदी उपाध्यक्ष श्री.पुडलिकराव अध्यात्मिक ट्रस्ट यांच्या संगीतमय मधुन वाणीतुन श्रीमद् भागवत कथा श्रवण केली जात आहे.

दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता ह.भ.प. रमेश महाराज पुरी यांच्या हस्ते कलशस्थापना व हनुमंतरायांचा अभिषेक करण्यात आला नंतर श्रीमद् भागवत कथा सप्ताहाला सुरवात करण्यात आली. साथसंगत तबलाविशारद व मृदंगमणी ह.भ.प.दिलीप महाराज मडावी मनसावळी,संगीत विशारद व आर्गनवादक ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज वानखेडे डवलापुर, संगीत गायक ह.भ.प.सोमेश्वर महाराज गौरकर भुगाव, ह.भ.प.पंढरीनाथ महाराज उरकुडे सावंगी. झाकिकार ह.भ.प.दिनेश महाराज ढेंगणे पहापळ, यांच्या संगीतमय मधुन वाणीतुन श्रीमद् भागवत कथा श्रवण केली जात आहे.

श्रीमद् भागवत कथा श्रवण करण्यासाठी कोसारा सोईट येथील महिला पुरुष युवक, युवती व बाल गोपाळ मोठ्या संख्येने भक्तिमय वातावरणात श्रवण केली दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी कोसारा तसेच बाहेर गावावरुन महिला पुरुष भजनी मंडळांनी कोसारा गावातील प्रमुख मार्गानी टाळमृदगाच्या निनादात भक्तीमय वातावरणात नानाजी महाराज व जगन्नाथ महाराज, विठ्ठल रुक्मिणी यांच्या पालखीची भक्तीमय वातावरणात शोभायात्रा काढण्यात आली.

गावातील महिलांनी आपआपल्या घरासमोर रांगोळ्या काढुन शोभायात्राचे स्वागत करण्यात आले व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाची मंडपात ह.भ.प. अविनाश महाराज यांचे काल्याचे किर्तन करण्यात आले व महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला.त्यामुळे कोसारा सोईट गावाला पंढरपूरचे स्वरुप प्राप्त झाल्यासारखे दिसुन येत होते.
Previous Post Next Post