Page

अन्नदान व गरजूना कपडे वाटप


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील गोर बंजारा क्रांतीसुर्य सेवालाल समिती च्या वतीने आज गुरुवार ला संत सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. 

क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुट्टी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला. आता ते गाव सेवागड या नावाने ओळखले जाते.
'सेवा ही समर्पण है' ह्या सेवाभावी वृत्तीतून संत सेवालाल महाराज जयंती ऊत्सव निमीत्ताने आज गुरुवार दिनांक 15/2/24 रोजी सकाळी 9:30 वाजता अन्नदान करण्याचे आले. संत सेवालाल महाराज भोग विधी झाल्यानंतर लगेच अन्नदानाचा करून गरजूना कपडे वाटप करण्यात आले.
यावेळी दत्तात्रय जाधव, विजय राठोड,  मनोज राठोड, अवि पवार, गौरव चव्हाण, विनोद राठोड, जितु राठोड, गोविंद राठोड, डाॅ. लोढा, अजय छल्लानी, प्रफुल खिवंसरा,  योगेश खिवंसरा, कालुसेठ अमरवानी, प्रवीण खानझोडे, तसेच शेकडो समाज बांधव व मित्रपरिवार उपस्थित होते.