टॉप बातम्या

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त TDRF कडून स्वच्छता अभियान


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : दरवर्षीप्रमाणे दि. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त टी डी आर एफ च्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.    

TDRF संस्थापक तथा संचालक हरिश्चंद्र राठोड यांच्या नेतृत्वात TDRF उपविभागीय अधिकारी कार्यालय वणी च्या वतीने TDRF वणी कंपनीतील (तालुक्यामधील) सर्व TDRF अधिकारी व जवान यांनी शहरातील छोरीया लेआउट मधील परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ केला. 
 
या स्वच्छ्ता अभियानासाठी TDRF मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान सय्यद, कंपनी कमांडर गणेश बुरांडे,वितेश वंजारी, साहिल लोखंडे, वेदिका येरकाडे,हर्षाली मालेकार ,ईशा जुनघरी, कुंदन साहू, वैभव मडावी, किरण आत्राम,आस्था मोगरे ,श्रुती बोंडे, दुर्गा डाकरे, खुशी ताजणे ,वृषाली वाटेकर, प्रेम सातपुते, प्राची खोके, सानिका सोनटक्के,वस्ती कुडमिते रजनीकांत कुरसंगे अस्मिता वाडके इ. जवानांनी विशेष कार्य केले. या उपक्रमासाठी त्या परिसरातील संगीता टेमुर्डे अर्चना मुजगेवार, अश्विनी रामगीरवार, स्नेहा नागपुरे, साक्षी मुजगवार, इत्यादी महिला सुद्धा उपस्थित होत्या.
Previous Post Next Post