टॉप बातम्या

प्रजासत्ताकदिनी विस्तार अधिकारी सुधाकर जाधव यांचा सत्कार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव तालुक्यातून मतदार नोंदणी कार्यक्रमामध्ये सर्व बीएलओ (केंद्स्तरीय मतदार नोंदणी अधिकारी) यांचे पर्यवेक्षण करण्यासाठी ८ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आलेले होते, उत्कृष्ट मतदार नोंदणी पर्यवेक्षक म्हणून श्री सुधाकर जाधव विस्तार अधिकारी पंचायत समिती मारेगाव यांचा प्रशस्तीपत्र प्रदान करून वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्री जाधव यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत प्रशासनाने २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी वणी येथील शासकीय मैदानात झालेल्या कार्यक्रमात, उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वणी विधानसभा मतदार संघाचे आमदार यांचे हस्ते व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री गणेश किंद्रे, तहसीलदार, निखिल धुरदळ, ठाणेदार, अजित जाधव, यांच्या प्रमुख उपस्थितीत विस्तार अधिकारी सुधाकर जाधव (पं स मारेगाव) यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे.


Previous Post Next Post