टॉप बातम्या

ऑटो पलटी होऊन युवक ठार तर, एक जन जखमी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मौजा कोलगाव येथून ऑटो घेवून मारेगाव च्या दिशेने येत असताना रस्त्याच्या वळणावर अचानक हे तीन चाकी वाहन अनियंत्रण होऊन पलटी झाल्याने या दुर्दैवी अपघातात मारेगाव येथील युवक ठार झाला, तर एक जखमी झाल्याची घटना आज (ता.7) जानेवारीला दुपारी 1 वाजता च्या दरम्यान, घडली.

भावेश विकास केळकर (34) असे दुर्दैवी अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव असून, दिनेश उईके रा. वडगाव ह.मु. कोलगाव हे गंभीररित्या जखमी झाले आहे. भावेश हा सकाळी ऑटोने प्रवासी घेवून गेला होता. परत येताना आटो चालवित सवंगड्या सोबत मारेगाव च्या दिशेने येत असताना कोलगाव ते मारेगाव या रस्त्यावरील वळणावर अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ऑटो पलटी झाला. या घटनेने तालुक्याभर हळहळ व्यक्त होत आहे.
   
भावेशच्या पाठीमागे आई वडील, पत्नी, बहीण व जावई असा बराच आप्त मोठा परिवार आहे. स्थानिक स्मशानभूमीत उद्या सकाळी त्याच्या पार्थिवावर अंत्य संस्कार होणार आहे.
Previous Post Next Post