वणी-यवतमाळ राज्य महामार्गांवर ट्रॅफिक जाम


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : भारत सरकारने ७ लाख रुपये दंड व १० वर्षाची शिक्षा,असा वाहन चालकांच्या विरोधात कायदा पारित केला आहे. हा कायदा रद्द करण्यात यावा, यासाठी करणवाडी फाट्यावर आज मारेगाव तालुक्यातील वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने (ता.११) ला रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील करणवाडी फाट्या वर हे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांनी यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करून निषेध व्यक्त केला. दरम्यान, या मार्गांवरील काही वेळासाठी ट्रॅफिक जाम झाली होती. त्यानंतर वाहन चालकांनी तहसीलदार यांच्या मार्फत प्रधानमंत्री भारत सरकार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माध्यमाशी बोलताना संघटनेच्या प्रमुखांनी सांगितले की, जर हा कायदा रद्द झाला नाही तर आम्ही सर्व मिळून आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा ईशाराही दिला.
या एकदिवशीय आंदोलनाचे जय जगन्नाथ चालक मालक संघटनेचे अध्यक्ष बबलू शेख, लाल बावटा वाहन चालक युनियनचे शबीर खां शेख खां पठाण, कॉ. बंडू गोलर यांच्या नेतृत्वात वाहन चालकांच्या मानगुटीवर बसणारा कायदा रद्द करण्यासाठी ऑल इंडिया ड्राइवर युनियन कडून बंन्सी पाटील, संतोष कळसकर, बबन पाटील, ताहेर सैय्यद, अनिल आकाश जांभुळकर, पवन नेहारे, शंकर पाकमोळे, बालाजी डोंगे यांच्या सह तालुक्यातील शेकडो वाहन चालक मालक रस्त्यावर उतरले होते.