मारेगाव तालुक्यात ठिकठिकाणी राम मंदिर व प्राणप्रतिष्ठा उदघाटन निमित्त विविध कार्यक्रम पार पडले


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : अवघा देश आज सोमवार (ता.22) ला राममय झाल्याचे चित्र असून अयोध्येत राम मंदिर व प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मारेगाव तालुक्यात ठिकठिकाणी पालखी, दिंडी व विविध कार्यक्रम पार पडले आहेत. 
               (महागांव येथील क्षणचित्रे)
तालुक्यातील महागांव,लाखापूर, व रामेश्वर येथे अयोध्यापती प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता सियाराम की जय हो, जयघोषात महागांव, लाखापूर, रामेश्वर नगरी दुमदूमली.
              (लाखापूर येथील क्षणचित्रे)
श्री राम प्रभूच्या प्राण प्रतिष्ठेच्या पावन पर्वावर महागाव येथे भव्य दिंडी व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच रामेश्वर येथेही रामलल्ला चा सोहळा उत्सहात पार पडला. तर लाखापूर येथे भव्य पालखी व भजन,पूजन कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. कार्यक्रमाच्या शेवटी भोजन व प्रसाद वाटप करून सांगता करण्यात आली.