सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या म्हैसदोडका येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (ता.१० जाने.) रोजी सायंकाळी पाच वाजता च्या दरम्यान उघडकीस आली.
तात्याजी नारायण बोथले (४२) असे गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने आपल्या राहते घरीच नायलॉन दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मृतक तरुणांकडे चार एकर शेती असल्याची समजते.
तात्याजी यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. मृतक यांच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व आई, असा बराच मोठा आप्त परीवार आहे. पुढील तपास पोलीस करित आहे.