सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कानडा (पार्डीं) ग्रामपंचायत येथील अपंग, विधवा, अल्पभुधारक, भुमीहीन, प्रकल्पग्रस्त, पुरग्रस्त, शेतकरी आत्महत्या अशा लाभार्थीना प्राधान्य न देता गावातील होतकरु लोकांना प्राधान्य देवुन घरकुल लाभ प्रदान करीत असल्याचे निवेदन आज गटविकास अधिकारी मडावी यांना देण्यात आले.
तालुक्यातील कानडा (पाडीं) येथील ओबीसी करिता बऱ्याच कालावधी नंतर मोदी घरकुल आवास योजना आली. मात्र, लाभार्थी निवड प्रक्रियेमध्ये सरपंच, सचिव व इतर पदाधिकारी यांनी अत्यंत गरजु लाभार्थीची निवड न करता आपल्या मर्जीतील व नातेवाईकांना प्राधान्य देवुन लाभार्थी निवड केलेली आहे. तसेच गावातील घरकुल लाभार्थी निवडीची ग्रामसभेबाबत माहीती न देता परस्पर हेतु साध्य करण्याकरीता ग्रामसभा घेवुन लोकांचा सहभाग न होवु देता आपसी संगनमताने घरकुल लाभार्थी निवड केली अशी तक्रार करण्यात आली आहे.
त्यामुळे अत्यंत गरजु लोकांना, प्राधान्यक्रमानुसार निवड प्रक्रिया राबवून उचित लाभाथ्यांना घरकुलाचा लाभ प्रदान करण्यात यावा व ग्रामसभेमध्ये घेण्यात आलेल्या बेकायदेशिर लाभार्थीची निवड रद्द करण्यात यावी तसेच पुनश्च ग्रामसभा घेवुन गरजु लाभार्थीची निवड करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी मागणीकडे दुर्लक्ष केल्यास पंचायत समिती मारेगांव येथील प्रांगणात सर्व वंचित लाभार्थी उपोषणास बसु असा गर्भीत ईशाराही देण्यात आला आहे.
यावेळी प्रशांत चवले ग्रामपंचायत सदस्य, पवण ढवस, प्रसाद ढवस, निलेश मोहितकर, आनंद देठे, देवराव धोबे, अंकुश आत्राम आदींची उपस्थिती होती.
घरकुल योजनेचा लाभ शासन निकषाप्रमाणे दिला जात असून लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेतून झाली आहे. विकलांग व विधवा यांना प्रथम प्राधान्य देवून गरजू लोकांनाच लाभ मिळणार आहे.-सुषमा रुपेश ढोकेसरपंच ग्रामपंचायत कानडा (पार्डी)