ग्राम सभेमधूनच प्राधान्य क्रमानुसार लाभार्थ्यांची निवड करा - ग्रामपंचायत सदस्य

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पहापळ ग्रामपंचायतचा 'मोदी आवास योजने'चा तिढा सुटता सुटेना. येथील लाभार्थ्यामध्ये गोंधळ निर्माण झाल्याने घरकुलाचा लाभ प्रतीक्षा यादी मध्ये समाविष्ट असलेल्या गरजू लाभार्थ्यांना ग्रामसभेमधूनच प्राधान्य क्रमानुसार लाभार्थ्यांची निवड करा,अशा आशयाचे निवेदन गटविकास अधिकारी पि एम मडावी यांना काल सोमवार ला देण्यात आले.

तालुक्यातील पहापळ ग्रामपंचायतला बऱ्याच प्रतीक्षेनंतर ओबीसी लाभार्थ्यांसाठी मोदी आवास योजने अंतर्गत 52 घरकुल मंजूर झाली आहे. त्याकरिता पहिली ग्राम सभा दि.17/11/2023 ला घेण्यात आली. परंतु कोरम पूर्ण नसल्याकारणांने होऊ घातलेली सभा तहकुब करण्यात आली. अशातच गट तटाच्या विरोधात तसेच गावातील परस्पर समर्थक यांच्यात एकमेकांवर आगपाखड करित घरकुल लाभ चहाट्यावर आल्याचे पाहायला मिळत असताना तीच सभा दि.29/11/2023 रोजी परत घेण्यात आली, त्यामध्ये गावातील जनता सभेला उपस्थित होते. मात्र, सभेचा विषय चालू असताना गोंधळ निर्माण झाल्यामुळे फक्त उपस्थित असलेले ग्रामपंचायत सदस्य व सचिव यांच्या उपस्थितीत कोणत्याही लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली नाही. असा आरोप काही सदस्यांनी केला आहे. 

त्यामुळे परत ग्रामसभा बोलावून योग्य व गरजावू लाभार्थ्यांची शासनाचे परिपत्रकानुसार प्रपत्र 'ड' चे यादी नुसार त्यांचा प्राधान्य क्रम ठरविण्यात यावा, असे दि.4 डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.

यावेळी पंचायत समितीला निवेदन देताना पहापळ येथील ग्रामपंचायत सदस्य भैय्याजी कनाके, हरी ठाकरे, साधना मोहितकर, चंदा गेडाम यांच्या सह अनेक लाभार्थी व महिला पुरुष प्रामुख्याने उपस्थित होते.


घरकुल लाभार्थ्यांची निवड करणे बाबत घेतलेल्या ग्रामसभेत झालेला गोंधळ पाहता शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्या करिता पोलीस बंदोबस्तात ग्रामसभा आयोजित करण्यात यावी. त्या शिवाय निकषाप्रमाणे लाभार्थ्यांची निवड होणार नाही.
- भैय्याजी कनाके
ग्रामपंचायत सदस्य पहापळ

शासनाच्या परीपत्रकानुसारच घरकुल लाभ मिळणार आहे. अपंग, भूमिहीन, अल्पभूदारक, अशा गरजू लोकांना प्राधान्याने लाभ मिळणार. 
- राहुल आत्राम
सरपंच ग्रामपंचायत पहापळ


Previous Post Next Post