गावगाडा कालपासून ठप्प! गाव कारभाऱ्यांचा तीन दिवस संप; कामे रखडणार..


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

जुन्या पेन्शननंतर आता संरपच आणि ग्रामपंच्यायत कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. विविध मागण्यांसाठी 3 दिवस ग्रामपंच्यातींचा कारभार ठप्प राहणार असून विविध संघटना या कामबंद आंदोलनात एकवटल्या आहेत.

राज्यातील सरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी आता त्यांच्या विविध मागण्यासाठी संपाचे हत्यार उपसले आहे. कालपासून म्हणजे 18 ते 20 डिसेंबर,तीन दिवस ग्रामपंचायतीचे कामबंद ठेवण्यात आले असल्याने गावगाडा ठप्प आहे. हे कर्मचारी पंचायत समित्यांसमोर आंदोलन सुर असून 27 हजार ग्रामपंचायत आणि 60 हजार कर्मचारी या आंदोलनात सहभागी होत असल्याचे समजते.

या आहेत मागण्या..
● ग्रामपंचायत सदस्य भत्ता, सरपंच उपसरपंच थकीत मानधन अदा करावा. 
● मानधनात भरीव वाढ करावी, 
● मानधनाची शंभर टक्के रक्कम शासनानेच द्यावी, 
● विनाकारण कामावरून कमी केलेल्या ग्रामरोजगार सेवकांना परत कामावर घेण्यात यावे, 
● नगरपालिका कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही दर्जा देऊन वेतन देण्यात यावे, 

यासह संगणक परिचलकांच्या मागण्यासाठी हे तीन दिवस आंदोलन पुकारण्यात आले आहे.
या संपात अखिल भारतीय सरपंच परिषद, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना, ग्रामपंचायत कामगार सेना या बरोबरच ग्रामपंचयातींशी संबंधित सर्व संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. या आंदोलनानंतर देखील मागण्या मान्य झाल्या नाही तर तिव्र लढा उभा करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

पंचायत समिती समोर काल सोमवारपासून सुरु असलेल्या कारभाऱ्यांचा संपामुळे ग्रामस्तरावरील कामकाज ठप्प असून ग्रामस्थांना याची झड सोसावी लागत असल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त करित आता राज्य सरकार काय निर्णय घेतात याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.
Previous Post Next Post