सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : शहरातील नामांकित श्री धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वणीच्या अध्यक्ष पदी सीमा विजय चोरडिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
विद्यमान अध्यक्ष आरती चौधरी यांनी व्यक्तिगत कारणास्तव राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय वणी, यांच्या आदेशानुसार एस.डी. मडावी सहाय्यक सहकार अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. यामध्ये सीमा चोरडिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या निवडीबाबत आरती संजय चौधरी यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना नवनियुक्त अध्यक्ष सीमा चोरडिया यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकत जी जबाबदारी दिली त्यामध्ये निश्चितच मी पतसंस्थेला प्रगती पथावर नेत पतसंस्थेच्या माध्यमातून तळागाळातील सर्व सामान्य लोकांना बचतीची सवय लावून कर्ज स्वरूपात कर्ज उपलब्ध करून जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न असणार आहे, अशा यावेळी त्या म्हणाल्या.
या निवडीच्या अनुषंगाने विजय चोरडिया यांनी सर्व महिला संचालकांचे आभार मानले. दरम्यान, संस्थेला प्रगतीपदावर नेण्याची हमी दिली. यावेळी आरती चौधरी, पूजा जुनगरी, वंदना राजूरकर, पल्लवी उदापूरकर, ताई मुठावार, सरोज कोनप्रतीवार, संगीता खुंगर, मंजू बिलोरिया, सविता राऊत, गीता तुराणकर, शुषमा येवले, सोनू मदान आदी संचालक उपस्थित होत्या.
या प्रसंगी एस.डी. मडावी सहायक सहकार अधिकारी यांचे स्वागत अतुल मुठ्ठावार यांनी तर कार्यक्रमाचे संचालन राजू तुराणकर यांनी केले.