सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : आज 17 डिसेंबर 2023 रविवार रोजी मारेगाव तालुका पेसा सरपंच संघटनेची नवीन तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्यात मारेगाव तालुका अध्यक्ष पदी सराटीचे सरपंच तुळशीराम कुमरे, सचिव दयानंद कुळमेथे (सरपंच खंडणी) तर उपाध्यक्ष पदी राहुल आत्राम (सरपंच पहापळ) यांची सर्वानुमते निवड झाली.
श्री. कुमरे यांचे नेतृत्व समाजाला दिशा देणारे असून तालुक्यात फार मोठ समाजाचे संघटन करून जागृती निर्माण करण्याचा काम कुमरे करीत आहेत. तसेच उच्च शिक्षीत, संयमी व अन्यायाविरूद्ध बंड पुकरणारे युवा नेतृत्व तुळशीराम कुमरे यांच्या रूपाने पुढे आले असून तालुक्यातील आदिवासीच्या गोरगरिबांना मदत करीत असतात.
तुळशीराम कुमरे यांनी आदिवासीच्या जल, जमीन, जंगल, याबाबत जिल्ह्यातून प्रथम आपल्याच पेसा गावामधून समाजासाठी त्यांनी लढा सुरू करणारे ते पहिले विद्यमान सरपंच म्हणून त्यांना ओळखले जाते.
तसेच आदिवासींच्या विविध योजना, शेती सुधारणेच्या योजना आदिवासी पर्यंत पोहचाव्या, विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळवा, शिक्षणाची सोय व्हावी यासाठी सातत्याने ते प्रयत्न आता मारेगाव तालुका पेसा सरपंच संघटनेच्या माध्यमातून करणार आहेत. असे ते 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना म्हणाले.
असे बहु आयामी नेतृत्व तालुक्याला मिळाले असून त्यांच्या कार्याची दखल सर्व आदिवासी समाज बांधवानी घेतली असून तुळशीराम कुमरे, दयानंद कुळमेथे व राहुल आत्राम यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा प्रा. शैलेशकुमार आत्राम, संजय आत्राम सर, कुमार अमोल कुमरे, आकाश कुमरे, करणवाडी उप सरपंच सौ. संगीता कोवे, बोरी (खु) सरपंच सौ. सुरेखा चिकराम, बुरांडा सरपंच रंगूताई आत्राम, माजी सरपंच विनोद आत्राम, सरपंच दादाराव टेकाम, सरपंच दादाराव ढोबरे, सुदर्शन टेकाम (आदिवासी सहकारी संस्था पिसगांव अध्यक्ष), माजी सरपंच तुकाराम आस्वले, सरपंच प्रशांत तोडासे, सरपंच संजय येरमे, भाऊराव मेश्राम, सदस्य मंगेश उईके, पत्रकार सुमित गेडाम, पत्रकार सचिन मेश्राम, सदस्य बालाजी आत्राम, ज्ञानेश्वर कोयचाडे, बंडू येरमे, प्रवीण येरमे यांच्या सह उपस्थित सर्व तथा आदिवासी बंधू भगिनीं यांनी दिल्या आहेत.