टॉप बातम्या

मारेगाव महसूल विभागाची धडक कारवाई, रेती तस्करी करणारा हायवा मध्यरात्री जप्त



सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात चोरट्या मार्गाने रेती तस्करांचा उच्छाद कायम असून, महसूल विभाग ऍक्शन मोडवर असतांना शनिवारीच्या मध्यरात्री आणखी छापा टाकण्यात आला. ते चारचाकी वाहन दांडात्मक कारवाई साठी जप्त करण्यात आले. या धडक कारवाईने तस्करांचे धाबे दणाणले आहेत. 
मारेगाव तालुक्यातील रेती तस्कर वर्धा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी करण्यात माहीर असल्याचे बोलले जात आहे. हे तस्कर संबंधित अधिकारी कधी कुठे जातात येतात, याची खबर घेत आपले हित साध्य करीत असतात. मात्र, यावेळी त्यांचा डाव फसला आणि कोसारा घाटातून रेतीची अवैध वाहतूक करणारा हायवा वाहन क्र. (MH-32 AK-4446) कुंभा येथे महसूल विभागाच्या गळाला लागला. 
ही कारवाई शनिवारच्या मध्यरात्री केली असून, हायवा दांडात्मक कारवाई साठी तहसील कार्यालयात जमा केला. एवढ्या मोठ्या वाहनावर तालुक्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचे बोलल्या जात आहे. 
तहसीलदार उत्तम निलावाड यांचे मार्गदर्शनात तलाठी कुडमेथे, सोयाम, कोतवाल गायकवाड, कोयचाडे यांनी ही कारवाई केली.
Previous Post Next Post