मारेगाव : शहरातील मुख्य मार्गावरील विविध ठिकाणी बसचा थांबा देण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन तालुका भाजप मारेगावच्या वतीने काल मंगळवार ला वणी आगार प्रमुखांना देण्यात आले आहे.
मारेगाव शहरातील कला वाणिज्य महाविद्यालय जवळ वणी वरून यवतमाळ कडे जाताना, मार्डी रोड तसेच नियमित ठिकाणी व यवतमाळ वरून वणीकडे येत असताना मार्डी रोड, नियमित ठिकाण व शहरातील राष्ट्रीय विद्यालय येथे बस थांबा द्यावा अशी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे यांच्या नेतृत्वात आगार प्रमुख, आमदार व यवतमाळ जिल्हा व्यवस्थापक यांना मागणी करण्यात आली. शहरातील मार्डी चौक, विद्यालय ते महाविद्यालय या मार्गावर बस थांब्याची आवश्यकता आहे. सर्वसाधारण लोकांना येजा करण्याकरिता वाढत असलेली वस्ती बघता मारेगावातील लोकांना वणी वरून जाताना बस थांबा दोन ठिकाणी देण्यात यावा तसेच यवतमाळ वरून येताना दोन ठिकाणी बस थांबा द्यावा अशी मागणी आहे.
शहरातील प्रवाशांना बस पकडण्याकरिता रोजच दोन किलोमीटर पायी अंतर कापत धावपळ करावी लागते. मात्र, शहरात येथे बस थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. येथून बसणाऱ्यांची प्रवासी संख्या पाहता नमूद ठिकाणी बस थांबा देण्याची मागणी भाजपा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, प्रशांत नांदे, रविंद्र टोंगे, सुमित जुनगरी व परिसरातील नागरिकांनी यांनी केली आहे.