टॉप बातम्या

मारोती गौरकार यांचे सर्व काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : राज्यातील येणाऱ्या पुढील काळात लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, व पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकतात. या अनुषंगाने अनेक पक्ष, राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटना, आतापासूनच आपापल्या तयारीला लागले असून त्यात काँग्रेसही मागे नाहीत.

मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने येणाऱ्या सर्व निवडणूका करिता बूथ कमिटी नेमण्यात येत असून प्रत्येक बूथ वर किमान 10 सदस्य आणि त्या मधून एक अध्यक्ष व तर एक उपाध्यक्ष अशी निवड प्रदेश काँग्रेस व जिल्हा काँग्रेस यांच्या आदेशानुसार करण्यात येत आहे,अशी माहिती तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी दिली.

मारेगाव शहर तथा तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सूचना केली आहे की, वरीलप्रमाणे आपण सर्वांनी कार्याला लागून सदर, मोहीम 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण करायची आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार मी तालुका अध्यक्ष म्हणून आवाहन करतो आहे की, हे कार्य करित असताना काही अडचण आल्यास मला स्वतः संपर्क साधावा. मी आपल्या सेवेकरिता पूर्णतः तटस्थ आहे, असे श्री.गौरकार "सह्याद्री चौफेर" ला बोलताना सांगितले.

यावेळी आमच्या प्रतिनिधीने होऊ घातलेल्या पाच राज्यातील निवडणूकांच्या निकालाबाबत संवाद साधला असता मारोती गौरकार म्हणाले की,पाच पैकी तीन राज्यात काँग्रेसचे सरकार येइल असे विविध माध्यमातून सांगितले जात आहेत. हे निश्चित स्वागतार्ह असणार आहे. मात्र, हा भाजपाला मोठा झटका आहे, भाजप आता सर्वसामान्य जनतेच्या नजरेतून उतरली असून आता शेतकरी, सर्वसामान्य जनतेचं सरकार, काँग्रेस सरकार येणार आहे. हे मानावं लागणार आहे.
Previous Post Next Post