टॉप बातम्या

शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या आयुष्यात भरभराट व समृद्धीचा प्रकाश घरोघरी नांदावा - अध्यक्ष आशिष खुलसंगे


आजपासून तेजोमय प्रकाश, आनंद व समृद्धीचे प्रतीक असलेल्या दिवाळीचे पर्व सुरू होत असून, यानिमित्ताने शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या आयुष्यात भरभराट व समृद्धीचा प्रकाश घरोघरी नांदावा, अशा शब्दात वसंत जिनिंग चे अध्यक्ष तथा तालुका काँग्रेस कमिटी झरी व माजी जिल्हा परिषद सदस्य, राजे फाउंडेशन चे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांनी दिवाळी निमित्त वणी विधानसभा क्षेत्रातील तमाम जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

दिवाळीचे पर्व, अभ्यंग स्नान, दिवाळी, लक्ष्मीपूजन, पाडवा अशा विविध सणांनीं संपन्न असते. सर्व कुटुंब एकत्रित येऊन दिवाळीच्या या पर्वाचा आनंद घेताना फराळ, फटाके याचा आनंद घेत उत्सव साजरा केला जातो.

दिवाळीच्या या पर्वाच्या शुभेच्छा देताना आशिष खुलसंगे यांनी फटाके वाजवताना काळजी घ्यावी तसेच पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
Previous Post Next Post