Page

तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात पहापळ शाळा अव्वल

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : पंचायत समिती, मारेगाव अंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवाचे आयोजन स्थानिक राष्ट्रीय विद्यालय येथे 11 सप्टेंबर रोजी 10.30 ते 5.दरम्यान आयोजित करण्यात आले होते. यात पहापळ येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा पहापळ च्या चमूने प्रथम क्रमांक पटकावला. 

विज्ञान नाट्यमहोत्सवाच्या माध्यमातून जनजागृती व्हावी, विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी मनोरंजनातून विज्ञान अवगत होऊन समाजप्रबोधन व्हावे,हा उद्देश ठेवून दरवर्षी विज्ञान नाट्यमहोत्सवाचे तालुकास्तरावर आयोजन करण्यात येते. याही वर्षी पंचायत समिती मारेगाव अंतर्गत राष्ट्रीय विद्यालय मारेगाव येथे नाट्यमहोत्सवाचे अयोजन करण्यात आले होते. यात मारेगाव तालुक्यातील अनेक खाजगी विद्यालय तसेच उच्च प्राथमिक जिल्हा परिषद शाळांनी सहभाग नोंदविला होता. त्यात जि. प. उ. प्राथ. शाळा पहापळ प्रथम क्रमांक पटकावला.

पहापळ शाळेचे विज्ञान शिक्षक श्री संजय फुलबांधे यांच्या मार्गदर्शनात आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर आधारित मोबाईलके दुष्परिणाम ही हिंदी विज्ञान नाटिका सादर करण्यात आली.यामध्ये कु. नंदिनी निखाडे, स्नेहल वाढई, मानसी थेरे, वैष्णवी खुसपुरे, वेदिका इखारे,ईश्वरी वाढई, ईश्वरी पवार, आंचल पाझारे या विद्यार्थिनीचा सहभाग होता.
ही विज्ञान नाटिका यवतमाळ येथील जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्यमहोत्सव साठी पात्र झालेली आहे.त्यासाठी सर्व विद्यार्थी अतिशय मेहनत घेत आहेत. 

पंचायत समिती मारेगाव चे गटशिक्षणाधिकारी श्री. स्नेहदिप काटकर , विस्तार अधिकारी श्री. जानराव शेडमाके,केंद्रप्रमुख श्री. सूर्यभान चिडे यांनी मार्गदर्शन केले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. एन. टी. चौधरी, सहा. शिक्षक श्री. अमर पुनवटकर,पदवीधर शिक्षिका दिपमाला वाघमारे, सहा. शिक्षिका शिला गोंडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अमोल गुरनुले व पेसा समितीचे अध्यक्ष श्री. भैय्याजी कनाके तसेच सरपंच श्री. राहुल आत्राम यांनी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले.