अब्बास शेख यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरातील रंगनाथ नगर येथील रहिवासी अब्बास शेख अनवर यांचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे 47 वर्षाचे वय होते. ही दुःखद घटना आज शुक्रवार ला सायंकाळी 10.30 वाजताच्या दरम्यान घडली. 
       
शहरातील रंगनाथ नगर परिसरात वास्तव्यास असलेले, गवंडीकामासह एक होतकरू व कष्टकरी मेहनती अशी ओळख असणारे मनमिळाऊ अब्बास शेख अनवर, यांचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अब्बास भाई यांनी जेवण केले आणि निवांत बसले असता अचानक जळकी लागत आहे असे, कुटुंबियांना म्हणाले. घरच्यांनी त्यांना आराम करा म्हणून सांगितले. मात्र त्यांना या जगातून कायमचाच आराम मिळाला. आज त्यांचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. भाईंच्या अशा अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, बहीण, भाऊजी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.