टॉप बातम्या

सरस्वती आडे फाउंडेशन तर्फे मच्छिन्द्रा येथे वृक्षारोपण

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : झाडे ही धनापेक्षाही मौल्यवान आहे, म्हणून वृक्षाचे महत्व जाणून सरस्वती आडे फाउंडेशन,तर्फे वणी उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते मच्छिन्द्रा येथे राज्यमार्गाच्या रस्त्याच्या कडेला तथा आरोग्य उपकेंद्राच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवकुमार आडे, प्रभू राजगडकर, श्रीराम कुमरे, सुभाष आडे, संगीता आडे, रमेश आडे, उपसरपंच कंचना मेश्राम, ग्राम. सदस्य महेश मुसळे, तलाठी कुळमेथे, प्रवीण झाडे, वन समिती अध्यक्ष देवराव कुमरे, भैय्याजी कनाके (लोकप्रतिनिधी तथा पेसा समिती अध्यक्ष,पहापळ), अजय राजगडकर, पत्रकार तथा गौण खनिज अध्यक्ष कुमार अमोल कुमरे, आकाश कुमरे, रोजगार सेवक शैलेंद्र पेंदोर, ग्राम कर्मचारी दिनेश जुमनाके, लहूदास गेडाम, अविनाश किनाके, तसेच जि प शिक्षकवृंद आदींची उपस्थिती होती.
वृक्ष लागवड मानवी जीवनासाठी अत्यंत महत्वाची असून वृक्षारोपण आपल्या काळाजी गरज आहे. झाडे व रोपांच्या कमतरतेमुळे आपल्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात, कारण झाडांचा थेट परिणाम पर्यावरणावर होतो. वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे मत अध्यक्ष शिवकुमार आडे यांनी व्यक्त केले.
Previous Post Next Post