टॉप बातम्या

असा करा राष्ट्रीय चित्रपट दिवस साजरा, येत्या 13 ऑक्टोबरला सिनेमाची तिकिटे फक्त 99 रुपये मध्ये


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

सिनेप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त पुन्हा एकदा प्रेक्षकांना स्वस्त दरात तिकिटे पाहायला मिळणार आहेत. वास्तविक, मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच MAI ने गुरुवारी जाहीर केले की यावर्षी 13 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जाईल. MAI ने जाहीर केले की 13 ऑक्टोबर रोजी चित्रपट चाहत्यांना देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रति व्यक्ती केवळ 99 रुपये दराने चित्रपट पाहता येईल.

99 रुपयांमध्ये कुठे पाहाल चित्रपट?
 MAI ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, PVR, INOX, Cinepolls, Mirage आणि Delight यासह देशभरातील 4,000 हून अधिक स्क्रीन्सनी राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हातमिळवणी केली आहे. 

तिकीट बुक करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.

स्टेप 1: सर्वप्रथम पीवीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस या वेबसाइट्स ओपन करा. 
स्टेप 2: त्या साइट्सवर लॉग-इन करा. 
स्टेप 3: त्यानंतर सिटी आणि एरिरा सिलेक्ट करुन थिएटर निवडा.
स्टेप 4: जो चित्रपट बघायचा आहे, तो सिलेक्ट करा. 
स्टेप 5 : त्यानंतर सर्वात शेवटी वेळ सिलेक्ट करा. वेळ सिलेक्ट केल्यानंतर ऑनलाइन पेमेंट करुन प्रोसेस पूर्ण करा. त्यानंतर तुमचं तिकीट बुक होईल.


Previous Post Next Post