जागतिक आदिवासी दिनी केंद्र व राज्य सरकारचा निषेध..!

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : आदिवासी समाजाचे सांस्कृतिक वेगळेपण, मानवतेबद्दल असीम श्रद्धा, निसर्गावरील अतुलनीय प्रेम आणि अत्युच्च प्रामाणिकपणा व पारंपरिक निखळ गुणांचा गौरव म्हणून दरवर्षी जागतिक स्तरावर 09 ऑगस्ट हा ‘जागतिक आदिवासी दिन’ साजरा करण्यात येतो. हा दिवस राज्यातील समग्र आदिवासी समाजासाठी अस्मितेचा व आत्मसन्मानाचा दिवस आहे.

आज देशभरात 9 ऑगस्ट, जागतिक आदिवासी दिवस साजरा होत असतांना मारेगाव येथे जागतिक आदिवासी दिनी संपूर्ण तालुक्याच्या वतीने मणिपूर राज्यात घडलेल्या हिंसाचार व कलंकित घटनेचा जाहिर निषेध करण्यात आला.
दरवर्षी 9 ऑगस्ट, जागतिक आदिवासी दिवस मोठ्या थाटात साजरा केला जातात. मात्र यावर्षी मणिपूर येथे 101 दिवसापासून हिंसाचार सुरु असून त्याचं धग आजही शमलेली नाही, आदिवासी जनतेच प्रचंड हाल झाले आहे. महिला सुरक्षीत नाही. आदिवासी महिलांना निर्वस्त्र फिरवून पिंड काढली जात आहे व त्यांच्यावर बलात्कार केला जात आहे असे भयंकर निंदनिय प्रकार करण्यात येत आहे. तेवढे होवूनही शासन स्तरावर कार्यवाही करण्यात येत नाही. राज्य सरकार व केंद्र सरकार कडून कोणतीही दखल घेतली जात नाही. समाज माध्यमातून जेव्हा बघावयास मिळेल तेव्हा देश, विदेशात पडसाद पहायला मिळत आहे. तरी देखील भाजपा सरकार या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. यावरुन सरकार असंवेदनशील आहे असे दिसून येत आहे. असे आज समग्र आदिवासी समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनातून आरोप सह निषेध व्यक्त करण्यात आला.
आदिवासी समाज कृती समिती च्या वतीने आज जागतिक आदिवासी दिनी भव्य आक्रोश मोर्चा चे आयोजन करण्यात आले, सदर मणिपूर, प्रकरणात सरकार ने व्यक्तीशः जातीने लक्ष घालून संबंधीत गैरअर्जदारावर योग्य ती कार्यवाही करुन त्यांना मृत्यु दंडाची शिक्षा देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन मा. राष्ट्रपती महोदय यांना तहसीलदार यांचे मार्फत देण्यात आले आहे. यावेळी मारेगाव तालुक्यातील संपूर्ण आदिवासी समाज बांधव एकवटल्याचे पाहायला मिळाले. व केंद्र व राज्य सरकार चा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
Previous Post Next Post