सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : शहरातील विठ्ठल वाडी येथील सावित्रीबाई फुले वाचनालयाला 15 पुस्तके भेट देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
ओबीसी कृती समिती समन्यवक सुरेश मांडवकर यांचा अभिषचिंतन सोहळा स्थानिक सावित्रीबाई फुले वाचनालय येथे दि.21 ऑगस्ट रोजी विविध 15 पुस्तके भेट देऊन साजरा केला. दरम्यान उपस्थितांनी श्री मांडवकर यांना भावी जीवनाच्या सस्नेह निरोगी दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी वाचनालयाचे उपस्थित अध्यक्ष बाळासाहेब राजुरकर, अशोक चौधरी सहसचिव,शुभम कटु ग्रंथपाल, मोहन हरडे सर, प्रा.अनिल टोंगे सर, गजेन्द्र भोयर सर, प्रभाकर मोहितकर सर,व ओ बी सी बांधव वणी आदींची उपस्थिती होती.