सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
विनोद वारलु काळे (वय अंदाजे 56) रा. निळापूर असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. विनोद बुधवारी 16 ऑगस्ट ला सायंकाळी 9.30 वाजताच्या सुमारास घरी जेवण करून घरा बाहेर पडले. दरम्यान,विनोद आणि त्याचा एक सहमित्र सुहास आत्राम (वय अंदाजे 40) हे शौचालयास गेले. रस्त्याने शौचालयास जात असताना वणीकडून निळापुरच्या दिशेने येणारा ट्रक क्रमांक एम एच 40 सी.डी. 6635 या ट्रकने समोरून येणाऱ्या विनोद व सुहास ला जोरदार धडक दिली.
दरम्यान,धडक इतकी जोरदार दिली की, या धडकेत विनोद रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपात पडून त्याचा जागीच मृत्यू झाला व त्याचा सहकारी सुहास आत्राम याला जबर मार लागल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहे. सदर घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
विनोद याच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, जावई, भाऊ व असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.