निवड झालेल्या बीएसएफ व सीएपीएफ जवानांचे काँग्रेस कमिटी तर्फे अभिनंदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आदिवासी बहुल मारेगाव तालुक्यातील मच्छिन्द्रा, डोलडोंगरगांव येथील शेतकऱ्याच्या मुलाने जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर सिमा सुरक्षा दल (BSF) व केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) करिता सिलेक्शन झाले किंबहुना बीएसएफ दल व केंद्रीय सशत्र पोलीस दलामध्ये दोघांची निवड झाली आहे.

नाना अनिल पारोधी रा. मच्छिन्द्रा हा सीमा सुरक्षा दलात तर अमित दिलीप झिले हा केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये निवड झाली आहे. या दोघांची निवड झाल्याबद्दलची बातमी कळताच आज (ता.25) रोजी सायंकाळला डोलडोंगरगांव येथील निवासस्थानी भेट देत त्यांचे काँग्रेस च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले. दरम्यान, दोन्ही रक्षकांशी व अमित यांच्या कुटुंबियांशी आपुलकीने हितगुज साधले. तसेच महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) यामध्ये योगेश शेरकी यांची सुद्धा निवड झाल्याबद्दल त्याचेही अभिनंदन करण्यात आले. यावेळी मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने तिन्ही दलाच्या जवानांना व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

यावेळी सर्व काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, परिसरातील पक्षाचे कार्यकर्ते तसेच गावातील जेष्ठ नागरिक, पुरुष, महिला व बाल गोपालांची प्रामुख्याने उपस्थिती होती.